खानापूर (विनायक कुंभार) : स्वातंत्र्योत्सवाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने शांतिनिकेतन सीबीएससी पब्लिक स्कूलच्या वतीने शनिवार दि. 27 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकांनी सकाळी 7 वा. शांतिनिकेतन स्कूलमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मुला-मुलींसाठी असलेली ही स्पर्धा तीन गटामध्ये होणार असून 14 वर्षाखालील स्पर्धकांसाठी 3 कि.मी. अंतर असून अनुक्रमे 2500, 2000, 1500 तर त्यापुढील पाच क्रमांकाना स्पर्धकांना अनुक्रमे 500रू. व पारितोषिक अशी बक्षिसे आहेत. 17 वर्षाखालील स्पर्धकांसाठी 5 कि.मी. अंतर आहे. यासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 3000, 2500, 2250 व पुढील पाच क्रमांकासाठी 500रू आणि पारितोषिक तसेच खुल्या गटासाठी असेल्या स्पर्धेत 10 कि.मी. अंतर असून यातील विजेत्यांना प्रथम क्र.5000, द्वितीय क्र. 3000, तृतीय क्र.2000 व त्यापुढील पाच क्रमांकाना 500रू व पारितोषिक देण्यात येणार आहे.