देशभरातून विविध राज्यातील धावपटू खानापुरात दाखल जगदीश शिंदे यांची धडपड
खानापूर : मॅरेथॉन क्रॉस कंट्री व इतर दीर्घ पल्ल्याच्या स्पर्धेतील धावपटूंना प्रशिक्षण देऊन आंतराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम स्पर्धक तयार करणे या एकमेव उद्देशाने खानापूर शहरात ही राष्ट्रीय स्तरावरील संस्था स्थापन करण्यात आली असून आत्तापर्यंत हरियाणा, उत्तरप्रदेश, झारखंड, ओरिसा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, दिल्ली व इतर राज्यातील वीस धावपटूंनी या अकॅडमीत प्रवेश घेतला आहे. त्याशिवाय आणखीन काही धावपटू प्रवेश घेण्यासाठी संपर्कात आहेत, अशी माहिती या अकॅडमीचे संस्थापक व राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षक (कोच) जगदीश शिंदे यांनी अकॅडमीच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
Belgaum Varta Belgaum Varta