खानापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्रीमहालक्ष्मी ग्रुप संचलित शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, खानापूरच्या मैदानामध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धा पार पडली, 3000 पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला. या मॅरेथॉन स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष भाजपा नेते, संस्थापक श्रीमहालक्ष्मी ग्रूप श्री. विठ्ठल सोमना हलगेकर होते.
या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे भाजपा खानापूर तालुका अध्यक्ष श्री. संजय कुबल, भाजपा खानापूर तालुका जनरल सेक्रेटरी बसू सनिकोप, प्रमुख पाहुणे जगदीश शिंदे, कर्नाटक राज्य कार्यकारिणी सदस्या सौ. धनश्री सरदेसाई, भाजपा ज्येष्ठ नेते किरण यळ्ळूरकर, महादेव गांवकर, निवृत्ती पाटील, गजानन पाटील, सुनील भटजी, रामगुरवडीचे माळवे मामा, श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संचालक विठ्ठल करंबळकर, चांगप्पा नीलजकर, प्रा. राजेन्द्र पाटील, यल्लापा तिरविर, परशुराम खांबले, सूब्राव पाटील, पुंडलिक गुरव, नागेश जोगिजी, श्री. महालक्ष्मी मल्टिपर्पज सोसायटीतचे जनरल सेक्रेटरी तुकाराम हुंद्रे, सीईओ अजितकुमार मंगसुळे, विजय पाटील, श्रीमहालक्ष्मी ग्रुप संचलित लैला साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील, सीपीआय सुरेश सिंगे, माजी तालुका पंचायत सदस्य बाळाराम शेलार, आप्पया कोडोळी, तालुका ग्राम पंचायत संघटनेचे अध्यक्ष विनायक मुणगेकर, तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील, राजू सिध्दाणी, महादेव बांदेवडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विविध वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला होता.ते विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे
१४ वर्षाखालील मुलीच्या गटात प्रथम प्रियांका सावंत माऊली हायस्कूल गर्लगुंजी, व्दितीय क्रमांक पूजा हलगेकर तोपिनकट्टी हायस्कूल, तृतीय क्रमांक सृष्टि पाटील मराठी शाळा हलशी,
मुलांच्या गटात प्रथम सोमनाथ कदम टिळकवाडी हायस्कूल, व्दितीय क्रमांक वेदांत होसुरकर देवलती हायस्कूल, तृतीय क्रमांक विनायक गुरव मौलाना आझाद हायस्कूल खानापूर.
१७ वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक आकांक्षा गणेबैलकर ताराराणी काॅलेज, व्दितीय क्रमांक मिनाक्षी बुरूज ताराराणी काॅलेज, तृतीय क्रमांक स्वाती सावंत माऊली काॅलेज गर्लगुंजी, मुले प्रथम क्रमांक सौरभ देसाई रावसाहेब वागळे काॅलेज, व्दितीय सोमनाथ गुणापाचे तोपिनकट्टी हायस्कूल, तृतीय क्रमांक देवापा गुरव स्वामी विवेकानंद हायस्कूल
खुल्या गटात प्रथम शिवाजी शेलार मणतुर्गा, व्दितीय अक्षय चवलगी हिंडलगी बिडी, तृतीय क्रमांक प्रविण धामणेकर माऊली काॅलेज गर्लगुंजी आदीनी यश संपादन केले.
Belgaum Varta Belgaum Varta