खानापूर : गणेश चतुर्थी सणाच्या दुसऱ्याच दिवशीच म्हणजे गुरूवारी ऋषी पंचमी (उंदरी) असल्याने खानापूरात आठवड्याच्या बकरी बाजारात बकऱ्यांच्या खरेदी विक्रीत लाखो रूपयाची उलाढाल झाल्याचे दिसून आले.
गुरूवारी खानापूर तालुक्यात मोठ्याप्रमाणात उंदरीचा सण साजरा होणार आहे. त्याच्या तयारीसाठी बकरी खरेदीसाठी तालुक्याच्या अनेक खेड्यातून नागरिकांनी बेळगाव-पणजी रोडवरील खानापूरच्या वेशीतील हलकर्णी गावाजवळ मोठ्याने संख्येने गर्दी केली होती.
गोकाक, बेळगाव, हिरेबागेवाडी, बैलहोंगलसह खानापूर तालुक्यातील अनेक भागातून बकरी विक्रीसाठी आली होती.
वाढत्या महागाईमुळे बकऱ्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे.
१० हजार रूपयापासून ते ४० हजार रूपयापर्यंत बकऱ्यांचा दर ऐकावयास मिळाला. त्यामुळे नागरिकांना बकरी खरेदी करताना चांगलीच कसरत करावी लागत होती.
तालुक्याच्या अनेक गावातील नागरिकांनी सकाळी ८ वाजल्यापासून हलकर्णी गावाजवळ बकरी खरेदीसाठी हजेरी लावली होती. त्यामुळे सकाळपासून बेळगाव-पणजी महामार्गावर चक्काजाम झाला होता. याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले होते.