खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरापासून जवळ असलेल्या हलकर्णी (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी प्रवीण मारूती अगणोजी तर उपाध्यक्ष पदी रेणूका मल्लापा कुंभार यांची निवड करण्यात आली.
हलकर्णी ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी प्रवीण मारूती अगणोजी व हरीश शीलावंत याच्यात लढत होती. यावेळी निवडणूक प्रक्रिया पार पडली.
त्यामुळे प्रवीण अगणोजी यांना सात मते पडली. तर हरीश शीलावंत यांना सहा मते पडली.
या निवडणुकीत प्रवीण मारूती अगणोजी हे एक मताने निवडून आले. त्यामुळे त्याची अध्यक्षपदी निवड झाली.
उपाध्यक्ष पदासाठी सुध्दा निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यामध्ये रेणूका कुंभार यांच्याविरोधात महबूबा शेख अशी निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यावेळी उपाध्यक्ष पदासाठी रेणूका कुंभार यांनी एक मताने विजय मिळविला व उपाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पाडून घेतली.
यावेळी विजय अध्यक्ष, उपाध्यक्षाचा पुष्पहार व गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला.
Belgaum Varta Belgaum Varta