खानापूर : मराठा मंडळ करंबळ हायस्कूल करंबळ येथील खेळाडूनी मराठा मंडळ खानापूर येथे पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत खालीलप्रमाणे यश संपादन केले. मुलींचा खो-खो – प्रथम, मुलींची – कब्बडी द्वितीय, तसेच योगा कुमारी प्राची पाटील प्रथम कुमार रोहीत सुतार प्रथम, स्किपींग कुमारी नकुशा पाटील प्रथम, कुमार यकाप्पा पाटील प्रथम, या सर्वांना मुख्याध्यापक अनिल कदम व सर्व शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले. तर मंराठा मंडळच्या अध्यक्षा सौ. राजश्री नागराजू मॅडम यांचे प्रोत्साहन लाभले.