
खानापूर : पारीश्वाड क्रॉसपासून हाकेच्या अंतरावर पारीश्वाड रस्त्याच्या नाल्यावरील पुलाजवळच्या खड्ड्यामुळे रविवार दि. २८ रोजी बरगावच्या तरूणाचा बळी गेला. अमृत शंकर देसाई (वय ४२) असे मृत तरुणाचे नाव आहे.
अमृत देसाई हे रविवारी रात्री 7 च्या सुमारास दुचाकीने खानापूरहून आपल्या गावी बरगावला निघाले होते. या दरम्यान खानापूर-पारीश्वाड रस्त्याच्या निट्टुर नाल्यावरील पुलाजवळ पडलेल्या खड्ड्यांचा त्यांना अंदाज न आल्याने दुचाकीचे समोरील चाक खड्डयात गेल्याने ते रस्त्यावर आपटून पडले. यात त्यांच्या डोकीला दुखापत झाली. लागलीच स्थानिकांनी त्यांना सरकारी इस्पितळात आणले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद खानापूर पोलिसात झाली आहे .
अमृत यांनी हेल्मेट घातले असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता कारण त्यांच्या डोकीला सोडून इतरक्त कुठेही दुखपत झाल्याचे स्पष्ट झाले नाही. ऐन चतुर्थीच्या पूर्वी ही घटना घडल्याने बरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta