खानापूर (प्रतिनिधी) : येत्या बुधवारी दि. ३१ रोजी होणाऱ्या गणेशोत्सवाचे औचित्य साधुन शहरासह तालुक्यातील गावोगावी गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर सोमवारी दि. २९ रोजी खानापूर शहरात पोलिस खात्याच्या वतीने पथसंचलन काढून जनतेला शांततेत व उत्साहात गणेशोत्सव ११ दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी खानापूर येथील शिवस्माक चौकातुन पोलिसांनी पथ संचलनाला सुरूवात करून बाजार पेठ, चिरमुरकर गल्ली, विठोबा गल्ली, गुरव गल्ली, चौरासी मंदिराकडून खानापूर पारिश्वाड रोड मार्गे बेळगाव-पणजी महामार्गावरून शिवस्मारकात पथ संचलनाची सांगता केली.
यावेळी बेळगाव डीएसपी शिवानंद कटगी, खानापूर सीपीआय सुरेश शिंगे, नंदगड सीपीआय सतीश माळनगौडा आदी पोलिस अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta