खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेला जांबोटी, कणकुंबी परिसर आहे. पर्यटनाचा खजिना असूनही आतापर्यंत दुर्लक्षितच आहे. येथील स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होते. अशी स्थळे विकसित करून पर्यटकापर्यंत पोहोचविल्यास शासनाच्या महसुलात नक्कीच वाढ होणार आहे. तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पण असा प्रयत्न होत नसल्याने क्षमता असूनही अनेक स्थळे उपेक्षितच आहेत.
खानापूर तालुक्याचा परिसर पश्चिम घाटात येतो. येथील घनदाट जंगलात समृद्ध अशी जैवविविधता आढळते. पश्चिम घाटात आढळणाऱ्या वन्यप्राण्यांचे बहुतेक सर्व प्रजाती येथे आढळतात. येथील म्हादई खोऱ्याची तुलना केरळमधील सायलंट व्हॅलीशी करता येण्यासारखी आहे. येथील पर्यटन स्थळे मांडवी, मलप्रभा, मार्कंडेय, यासारख्या नद्यांची उगमस्थाने याच तालुक्यात आहेत. सडा किल्ला, भीमगड, आनंदगड, कदंबांची राजधानी हलशी, संगोळी रायन्ना यांच्या फाशीचे ठिकाण, तसेच निसर्गाने निर्माण केलेले जवळपास तीसहून अधिक धबधबे, स्वच्छ अल्हाददायक व आरोग्यपूर्ण हवा, निखळ शांतता असं बरंच काही समृद्ध वैभव पहावयास मिळते. याचा शासनाने गांभीर्याने विचार करून पर्यटनाच्या सोयी उपलब्ध करुन दिल्यास परिसरातील ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पनात वाढ होईल व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.
Belgaum Varta Belgaum Varta