खानापूर (विनायक कुंभार) : बरगाव ग्रा. पं. चे कर वसुलीदार रामलिंग रुद्राप्पा पाटील आणि लिपिक गावडू विठोबा पाटील यांनी खोट्या कर पावत्या वापरून कर वसुली, खोट्या सह्या करून नाहरकत पत्र दिले होते, या प्रकरणासंदर्भात सदस्या पद्मश्री पाटील यांनी १६ मे रोजी पुराव्यानिशी जि. पं. सीईओंकडे कारवाईची मागणी केली होती. या तक्रारीबाबत सीईओनी २० मे रोजी ता. पं. सह ग्रा. पं. ला चौकशीचे आदेश दिले होते. कर्नाटक ग्राम स्वराज आणि पंचायत राज कायदा नियम, २०२० च्या कलम ८ नुसार, संबंधित कर्मचार्यांची त्वरित चौकशी करू दोषी आढळल्यास, नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करा. तसेच याबाबात कार्यालयात अहवाल द्या, असा आदेश देण्यात आला होता. मात्र वरिष्ठांच्या या आदेशकडे कानाडोळा करण्यात आल्याची महिती ग्रा. पां सदस्या पद्मश्री पाटील यांनी दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta