खानापूर (प्रतिनिधी) : मेरडा (ता. खानापूर) येथील जनसेवक क्रीडा संघाच्या वतीने शनिवारी दि. ३ रोजी सकाळी ९ वाजता खानापूर तालुका मर्यादित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत एक गाव एक संघ नियमानुसार कबड्डी संघाना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी सर्व सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आधार कार्ड झेरॉक्स सादर करणे बंधनकारक राहाणार आहे.
विजेत्या पुरूष गटातील संघाला पहिले बक्षिस २१ हजार ३४३ रूपये, फिरता चषक व दुसरे बक्षीस ११ हजार ३४३ रूपये व फिरता चषक, तसेच महिला गटातील विजेत्या संघाला पहिले बक्षिस १२ हजार ३४३ रूपये व फिरता चषक, दुसरे बक्षिस ७ हजार ३४३ रूपये व फिरता चषक देण्यात येणार असून बेस्ट रायडर व बेस्ट कॅचरसाठी वैयक्तीक बक्षीस देण्यात येणार आहेत तरी तालुक्यातील कबड्डी संघानी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन जनसेवक क्रीडा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta