Wednesday , March 4 2026
Breaking News

नेरसा अर्भक प्रकारातील संशयित पोलिसांच्या जाळ्यात

Spread the love

 


खानापूर : ता. 28 रोजी बेळगांव वार्ताने नेरसे गवळीवाड्यातील नवजात अर्भक बेवारस नसून ते अल्पवयीन प्रेमीयुगलांचे असल्याचे वृत्त प्रसिद्ध करून शासनाला जाणीव करून दिली होती. आता याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मळू अप्पू पिंगळे (वय 21) असे संशयिताचे नाव आहे.
अर्भक प्लास्टिक पिशवीत ठेवून झाडाला लटकविण्याची घटना 25 तारखेला उघडकीस आली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार पिडीत अल्पवयीन मुलगी आणि मळूचे प्रेम संबंध होते यातूनच युवतीने मुलाला जन्म दिला. प्रसूती घरीच करून पोलीस कारवाईच्या भीतीने अर्भक पिशवीत घालून झाडाला लटकविण्यात आले. आशा कार्यकर्त्या सत्यवती देसाई यांना ही घटना समजताच त्यांनी ग्रामपंचायतीला कळवून तालुका रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी अल्पवयीन युवती व संशयित मळू याला पोलिसांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय चाचणी केली. मुलीला तापसानंतर कुटुंबियांकडे सोपविण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *