
खानापूर : तालुक्यातील भांबार्डा येथील कलमेश्वर मंदिराचा कॉलम भरणी समारंभ आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
आजकाल सगळीकडे फक्त राजकारण सुरू आहे, परंतु मी माझे समाजकार्य निरंतर चालू ठेवले आहे ते पुढे ही असेच चालू ठेवेन, शिक्षण व आरोग्य या दोन्ही विषयांना प्रथम प्राधान्य देत आहे, त्याचाच भाग म्हणून महिला व बालसंगोपण हॉस्पीटलचे काम, नवीन बसस्थानाकाचेही काम सुरु आहे. तालुक्यात शेकडो कोटींची कामे मंजूर करून आणल्याचा मला अभिमान वाटतो. तालुक्यातील जनतेने दिलेल्या अधिकारामुळे या गोष्टी शक्य होताहेत मंदिरासाठी आमदार निधीतून ५ लाख रूपये मंजूर करू तसेच २०० पोती सिमेंट व स्टील देणार असल्याचे वक्तव्य यावेळी त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णाजी पेडणेकर, हलशी पंचायतच्या अध्यक्षा मुनेरा संगोळी, उपाध्यक्ष संतोष हांजी, हालशी पंचायतचे मेंबर निंगाप्पा होसूर, अनिल सुतार, तमन्ना कोलकार, महेश मादार, मानतेश कल्याणी, हलशीवाडीचे साईश सुतार, घोटगाळी पंचायतचे अमर कुंभार, श्रीकांत देसाई, मारूती भेकणे, मुल्ला साहेब, रणजीत पाटील, शिवाजी भातखांडे, इतर मान्यवर, ग्रामस्थ मंडळी, गावातील महिला मंडळ, पंचक्रोशीतील सर्व पाहुणे मंडळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta