Thursday , December 11 2025
Breaking News

‘ऑपरेशन मदत’तर्फे राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण शिक्षण अभियानाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाअंतर्गत वनशेतीचा प्रारंभ

Spread the love

खानापूर : खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या गोल्याळी गावातील सरकारी शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना घेऊन ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपतर्फे वनशेतीचा प्रारंभ करण्यात येणार आहे. हा प्रयोग ग्रामीण शिक्षण अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, याद्वारे पर्यावरणीय समतोल राखला जाईल व सेंद्रिय शेतीचा विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, असे राहुल पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
या छोट्या शाळकरी मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण व्हावी व पर्यावरणात होणारा बदल कळावा, पर्यायाने निसर्गातील सजीव वस्तूवर होणारे दुष्परिणाम याबद्दल शिक्षीका आरती चौगुले यांच्यामार्फत माहिती देण्यात येत आहे. गोल्याळीच्या या मुला-मुलींनी आतापर्यंत परसदारी भाजीपाला लागवड, शाळेच्या आवारात भाजीपाला उगवून त्याचा माध्यांण आहारात वापर, फळझाडे व फुलझाडे लागवड असे अनेक प्रयोग ग्रामीण शिक्षण अभियानाच्या माध्यमातून केले आहेत. त्याबद्दल वेळोवेळी सर्वांना कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. असेच सेंद्रिय शेतीचे प्रयोग चिगुळे, आमटे, कणकुंबी, तळावडे तसेच खानापूर व चंदगडमधील धनगर वाड्यावर चालू आहेत.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *