खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव व पणजी राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या हत्तरगुंजी, मुडेवाडी व फुलेवाडी या तिन्ही गावांची झालेली समस्या राष्ट्रीय महामार्गावरून गावांमध्ये जाताना सर्व्हिस रोड, दुभाजक न सोडल्यामुळे या तिन्ही गावच्या लोकांना बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. कारण खानापूरकडून हत्तरगुंजी गावामध्ये वळताना दुभाजक न सोडल्यामुळे त्या लोकांना गणेबैल ब्रिजमधून फिरून परत गावांमध्ये जातेवेळी फार त्रास होत आहे व बेळगावला जाणाऱ्या लोकांना खानापूरला येऊन परत मराठा मंडळ कॉलेज जवळील ब्रिज पार करून बेळगावला जाण्याची वेळ आली आहे. या तिन्ही गावातील जनतेला इंधन खर्चाचा आर्थिक भार सोसावा लागत आहे. तरी तिन्ही गावच्या जनतेने या बिकट परिस्थिती समस्येविषयीची माहिती भारतीय जनता पार्टीचे नेते व बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रमोद सूर्यकांत कोचेरी यांच्या निदर्शनाला आणून दिली होती. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग धारवाडचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर शर्मा यांना या ठिकाणी बोलावून ही समस्या निदर्शनाला आणून देऊन माहिती दिली. या समस्या विषयी सर्विस रोड व दुभाजकची समस्या त्वरित निकाली काढण्याचे सांगितले व हा सर्व्हिस रस्ता खेमेवाडी गावापर्यंत झालेला आहे व तिथून फक्त 400 मीटर हत्तरगुंजी क्रॉसपर्यंत सर्विस रोड अत्यंत गरजेचे असल्याचे त्याना सांगितले तसेच राष्ट्रीय महामार्गाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर शर्मा यांनी सर्वे करतेवेळी आमच्याकडून चूक झाल्याचे कबूल करून ही समस्या त्वरित मिठवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच खानापूरच्या हद्दीमध्ये रोडच्या गटारीचे काम अर्धवट सोडल्यामुळे रोडचे पाणी शेतवाडीमध्ये जाऊन भात व इतर पिकाचे मोठे नुकसान होत आहे. ही समस्या त्या ठिकाणी मांडण्यात आली व ही गटारीची समस्या त्वरित सोडवून देण्याची विनंती केली. याप्रसंगी उपस्थित खानापूर भारतीय जनता पार्टीचे प्रधान कार्यदर्शी गुंडू तोपिनकट्टी व हलकर्णी ग्रामपंचायतचे अध्यक्ष प्रवीण मारुती अगनोजी, ग्रामपंचायतचे सदस्य रवींद्र मादार, भैरु कुंभार, माजी ग्रामपंचायतचे सदस्य शाहू अगनोजी व हत्तरगंजी, मुडेवाडी व फुलेवाडी खानापूर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta