खानापूर : चापगाव येथील श्री फोंडेश्वर मंदिरासमोर मोठा सव्वादोन लाख रुपये खर्चून हॅलोजन बल्ब बसवण्याची ग्वाही कौंदल गावचे सुपुत्र व पुणे येथे स्थायिक असलेले उद्योजक मारुती पाटील यांनी दिली.
यावेळी ग्रामस्थांनी ज्येष्ठांच्या हस्ते त्यांचा सत्कार करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. येत्या दोन महिन्यात काम पूर्णत्वाला नेईन, असे सत्कार प्रसंगी बोलताना ते म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक ह.भ.प. रामा धबाले, ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष रमेश धबाले, फोंडेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष पिराजी कुराडे, निंगाप्पा गोदी, पांडुरंग पाटील, अशोक बेळगावकर, पप्पू अंबाजी, नागो बेळगावकर, तोपिनकट्टी पंचायतचे उपाध्यक्ष लक्ष्मण तीरवीर, रवी पाटील, ऍड. आकाश अथणीकर, म्हात्रू गुरव व गावातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta