खानापूर (प्रतिनिधी) : ओलमणी (ता. खानापूर) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित राजर्षी शाहु हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत सी. कदम यांना हायस्कूल विभागातून यंदाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.
याबदल त्याचा परिचय मुख्याध्यापक सी. एस. कदम हे राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी या स्कूलमध्ये 2019 पासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्याचे मुळगाव निडगल असुन 1989 यावर्षी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये नेमणूक झाली. तेव्हापासून आजपर्यंत 32 वर्ष त्यांची सेवा पूर्ण झाली आहे. त्यामध्ये मध्यंतरी 2000 ते 2005 अशी पाच वर्ष गोधळी हायस्कूल येथे बदली झाली होती. त्यानंतर पुन्हा ओलमणी हायस्कूल येथे बदली झाली.
जिल्हा आदर्श शिक्षक मिळाल्यामुळे त्यांचे तालुक्यात अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta