सातनाळी ता. खानापूर ग्रामस्थांच्या वतीने खानापूर समितीच्या नेत्यांनी केली मागणी
खानापूर : पांढऱ्या नदीवरील सातनाळी गावाला जोडणारा संपर्क पुल पांढऱ्या नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला यामुळे सातनाळी गावचा संपर्क तुटला. गेल्या दोन वर्षांपूर्वी हा संपर्क पुल उभारण्यात आला होता. निष्कृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूचे भराव वाहून गेले. त्यामुळे सातनाळी गावच्या ग्रामस्थाबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा बारा ते चौदा किलोमीटर पायपीट करावी लागत आहे तरी संबंधित खात्याने वाहून गेलेल्या पुलाची पुनर्बांधणी करावी, असे निवेदन सातनाळी गावच्या ग्रामस्थांनी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा व ज्येष्ठ नेत्यांच्या माध्यमातून तहसीलदाराकडे देण्यात आले.
यावेळी समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, देवाप्पांना गुरव, निरंजन सरदेसाई, राजू पाटील, रामचंद्र गावकर, ग्रामपंचायत सदस्य नितेश मिराशी, विजय घोटगेकर, महेश दळवी, सुनील घोडगेकर संदीप इंजोळकर, दिवाकर घोटेकेकर, नितेश वाटलेकर नामदेव गावकर, देविदास इंजोळकर, नंदकुमार घोडकेघर, सोमनाथ वाटलेकर, दिलीप देसाई, अजय देसाई, अभिषेक घोडकेकर, कृष्णा इंदूरकर, दिनेश घोटकेकर, विजय दळवी, काळू कोपदार बळीराम दळवी, राजाराम देसाई आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta