


खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील गरीब शेतकरी नारायण अष्टेकर यांचे घर नंबर ६१९ हे राहते घर सोमवारी दि. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळून जमिनदोस्त झाले.
या घरात गणेश मुर्ती करण्यासाठी आणलेले साचे, शेतीची अवजारे, संसार उपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.
यावेळी घटनेची माहिती मिळताच ग्राम पंचायतीचे पीडीओ जी. एल. कामकर, गर्लगुंजी गावचे तलाटी श्री. मराठे, ग्रामपंचायत सदस्य आदीनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी नुकसानग्रस्त नारायण अष्टेकर यांना सरकारने नुकसान भरपाई वेळेत देऊ करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta