


खानापूर : मौजे चापगाव तालुका खानापूर येथे काल रोजी श्री वक्रतुंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कदम गल्ली यांच्या सौजन्याने मेरडा येथील सुप्रसिद्ध सोंगी भजनी भारुडचा कार्यक्रम झाला. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खानापूर तालुक्याचे माजी आमदार, भाजपाचे नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक श्री. अरविंद पाटील उपस्थित होते.
त्यावेळी त्यांनी बोलताना चापगाव गावातील कोणताही कार्यक्रम असो शर्यत किंवा कुस्ती या दोन्ही खेळांमध्ये बेळगाव जिल्ह्यात आपले नाव लौकिक केलेले आहे. गेली तीस वर्षे या गावाशी माझा असलेला दृढ संबंध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कायम परी या गावांमध्ये येणे-जाणे असते. या गाववासीयांनी सुद्धा माझ्यावर भरभरून प्रेम केलेले आहे यापुढे सुद्धा असेच प्रेम माझ्यावर राहू दे, अशी मी या गणपती बाप्पा चरणी अर्पण करतो. त्यांच्या कालावधीमध्ये झालेला विकास आणि तत्पर्य कामे याच्याबद्दल माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. महादेव दळवी होते. व्यासपीठावर ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष श्री. मारुती चोपडे, माजी अध्यक्ष रमेश दबाले, धर्मांनी शहापूरकर, ग्रामपंचायत सदस्य नजीर सनदी, हनुमान पीकेपीएस अध्यक्ष उदय पाटील, संचालक नारायण गोदी, यल्लाप्पा कदम, संतोष कदम, कल्लाप्पा कदम, गणेश कदम, रोशन पाटील, संतोष जिवाई, ज्ञानेश्वर दिवाळी, पिराजी महाराज, महादेव पाटील, मुकुंद पाटील, अभिजीत पाटील, मोनेश्री कदम, मातृ कदम, गंगाराम कदम, मारुती कदम, यांचापा बेळगावकर, विष्णू बेळगावकर, चंद्रकांत बेळगावकर, रडू कदम, राजीव कदम, धोंडू धबाले, संतोष धबाले, पांडुरंग पाटील, आशिष शहापूरकर, रामदास कदम, हनुमंत कदम, मारुती बेळगावकर, मारुती कदम, पांडुरंग पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी तालुका पंचायती उपसभापती श्री. मल्लाप्पा मारीहाळ यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta