


खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका आम आदमीची महत्वपूर्ण बैठक येथील शिवस्मारकातील सभागृहात नुकतीच पार पडली.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील होते.
यावेळी व्यासपीठावर श्री. चनबसव देवरे स्वामीजी, झोन इनचार्ज राजू टोपणावर, जिल्हा अध्यक्ष शंकर हेगडे, सेक्रेटरी शिवाजी गुंजीकर, दशरथ बनोशी, प्रभाकर पाटील, लबीब शेख, चंद्रकात मेदार, शहर अध्यक्ष गोपाळ गुरव, मोहन मलिक, राम गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत सेक्रेटरी शिवाजी गुंजीकर यांनी केले. तर खानापूर तालुका रक्षणवेदिकेचे अध्यक्ष दशरथ बनोशी यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांचे आम आदमी मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील म्हणाले की, खानापूर तालुक्यातील जनतेला आम आदमी पक्षाची गरज पडू लागली आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून खेडोपाडी आम आदमीचे कार्यकर्ते मोठ्या उमेदीने पक्षासाठी धडपडत आहेत.
आता दशरथ बनोशी सारखे समाजसेवक आम आदमी पक्षात प्रवेश केल्याने पक्षाला अधिकच बळ येणार व तालुक्यातील जनताही आम आदमी पक्षाकडे नक्कीच वळणार असा विश्वास व्यक्त केला.
झोन इनचार्ज राजू टोपणावर यांनी बोलताना सांगितले की, आम आदमी पक्षाची आज जनतेला नितांत गरज आहे. म्हणून आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन पक्षाची तत्वे लोकांपर्यंत पोहचविणार. व लोकांच्यावरील अन्याय दुर होणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवर आम आदमी पक्षाबद्दल माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार शहर अध्यक्ष गोपाळ गुरव यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta