Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावातील नाईक कुटुंबियांनी साकारली कपिलेश्वर मंदिराची प्रतिकृती!

Spread the love

बेळगाव : बेळगावातील नाईक कुटुंबियांनी आपल्या घरातील गणपती समोर दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री कपिलेश्वर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.
महाद्वार रोड येथील नाईक कुटुंबीय दरवर्षी आपल्या घरातील गणपती समोर वैशिष्ट्यपूर्ण देखावा सादर करतात. मागच्या वर्षी मुंबईच्या चाळीची प्रतिकृती त्यांनी सादर केली होती. यावर्षी श्री कपिलेश्वर मंदिराची प्रतिकृती सादर केली आहे. ही प्रतिकृती साकार करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष मंदिराचे मोजमाप घेऊन त्या प्रमाणात प्रतिकृती उभारली आहे. मुख्य महादेव मंदिराचे तर बारीक सारीक तपशील त्यांनी प्रतिकृतीत दाखवले आहेत. मंदिराच्या आवारातील मूर्ती, गणपती मंदिर, धूनी, नाग मंदिर या बरोबरच मंदिरात दर्शनाला आलेले भाविक, आवारातील झाडे, त्यावर बसलेले पक्षी हुबेहूब साकारले आहेत. हा देखावा सादर करण्यासाठी त्यांना बारा दिवसाचा कालावधी लागला. आर्किटेक्ट प्रदीप नाईक, कुणाल नाईक, वरदा नाईक, शुभम नाईक, रेखा नाईक, अक्षय नाईक, अमृत नाईक आणि ऋतुराज नाईक यांनी ही कपिलेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *