खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिमागासलेल्या भागातील कौलापूरवाड्यात एक गाव एक गणपतीची परंपरा आजही मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे.
याबद्दल आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी बोलताना सांगितले की, तालुक्यातील छोटे गाव म्हणून कौलापूरवाड्याकडे पाहिले जाते. या गावात गेली 20 वर्षे अखंड एक गाव एक गणपती पंरपरा चालु आहे. या एक गाव एक गणपतीच्या परंपरेने गावात एकोपा, भक्ति मार्गी लागली आहे.
गावचा हा गणेशोत्सव सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मोठ्या गुण्यागोविंदाने उत्साहात साजरा करतात. गणेशोत्सव निमित्त बाहेर गेलेले चाकरमानी या सार्वजनिक गणेशोत्सवाला आनंदाने हजर राहतात. एकाला दिवस मोठ्या उत्साहाने हा सार्वजनिक गणेशोत्सव कौलापूरवाड्यात साजरा केला जातो.
यावेळी आम आदमीचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील, गणेश मंडळचे अध्यक्ष आपू शिंदे, उपाध्यक्ष गंगाराम पाटील, सेक्रेटरी सखाराम येडगे, बापू पाटील, रामा गावडे, विजय गावडे, साजू पाटील, बाबू बावदाने, नामदेव पाटील, रामा येडगे आदी यावेळी उपस्थित होते.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …