


खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील जनतेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. सरकारी कार्यालयात जनतेच्या समस्या जाणून घेत नाहीत. त्यामुळे खानापूर तालुक्यातील जनता वैतागली आहे. या खानापूर तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कोणी तरी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
म्हणून खानापूर तालुका विकास आघाडी व ज्ञानेश्वर माऊली ग्रुप पुढेे आली. त्याच्या माध्यमातून समस्या निवारण केंद्राचे उभारणी करण्यात आली, असे मत खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यानी शिवस्मारक चौकातील कार्यालयात समस्या निवारण केंद्राचे उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दोड्डहोसुर गावचे ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील होते.
कार्यक्रमाला सदानंद मासेकर, संजु गुरव, दत्ता कदम, मंगल गोसावी, दिनेश पाटील, मनोहर मादार, किरण मादार, सुनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यालयाचे उद्घाटन खानापूर विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी खानापूर तालुक्यातील जनतेच्या समस्या असतील तर समस्या घेऊन शिवस्मारक चौकातील समस्या निवारण केंद्रात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta