खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष सुरेश मेलगे यांनी १५ महिन्याच्या कालावधीनंतर आपल्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर उपाध्यक्ष पदाची निवड नुकताच पार पडली.
यावेळी ग्राम पंचायतीच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी कळसाभंडुरा प्रकल्पाचे अभियते बी. ए. मराठे यांनी काम पाहिले.
गर्लगुंजीत ग्राम पंचायतीच्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार अशी माहिती पीडीओ जोतिबा कामकर यांनी सांगितली.
त्यानंतर उपाध्यक्ष पदासाठी अजित पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी मावळते उपाध्यक्ष सुरेश मेलगे यांनी आपली सुत्रे नुतन उपाध्यक्ष अजित पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.
ग्राम पंचायतीच्या उपाध्यक्ष पदासाठी अजित पाटील यांची निवड होताच अध्यक्ष सदस्यानी नुतन उपाध्यक्ष अजित पाटील याचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार केला.
यावेळी नुतन अध्यक्षा सौ. वंदना अशोक पाटील, सदस्य हणमंत मेलगे, परशराम चौगुले, प्रसाद पाटील, सुरेश मेलगे, सदस्या अनुराधा निट्टूरकर, रेखा कुंभार, सुनिता सुतार, अन्नपूर्णा बुरुड, सौ. कोलकार, पीडीओ जोतिबा कामकर व ग्राम पंचायतीचे कर्मचारी गावचे नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta