खानापूर (उदय कापोलकर) : कठोर परिश्रमातून कोणतेही यश खेचून आणता येते याची जाणीव ठेवून देण्याच्या दिशेने अवितरणपणे वाटचाल केल्यास उज्वल भविष्य घडविता येते, असे प्रतिपादन कुडाळ येथील पाटकर-वर्दे महाविद्यालयाचे प्राध्यापक अमोल राहुल यांनी केले. लोंढा तालुका खानापूर येथील लोंढा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना चिकिस्तक समूह मुंबई यांच्या वतीने मोफत शालेय गणवेश आणि शैक्षणिक सामग्रीचे वितरण केल्यानंतर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लोंढा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक नेसरीकर होते. व्यासपीठावर सचिव संतोष भुतकी, डॉक्टर सुरेश पंडित, प्रा. विवेकानंद शेट्टी, महेश पंडित, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर व सचिव वासुदेव चौगुले, मरू पाटील, दीपक देसाई, विठ्ठल गुरव, ईश्वर बोबाटे उपस्थित होते. अकराळी, मोहिशेत, वाटरे, पाटये, राजवाळ येथील ९५ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक एन. डी. पाटील यांनी स्वागत केले.
Belgaum Varta Belgaum Varta