खानापूर : दि. 7 रोजी खानापूर तालुक्यातील कारलगा गावामध्ये भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक श्री. अरविंदराव पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, कारलगा हे उच्च शिक्षित गाव असून गावामध्ये शिक्षक व सैनिक फार आहेत. त्यासाठी या सैनिकांचा सत्कार करण्याआधी कर्तव्य आहे. आम्ही गावांमध्ये सुखरूप राहतो हे सर्व पुण्याई या सैनिकांना दिले पाहिजे. ते रात्रंदिवस सीमारेषेवर देशाचे रक्षण करतात, असे प्रसंगोद्गार अरविंद पाटील यांनी काढले.
यावेळी तालुका पंचायतचे माजी सभापती सयाजी पाटील, माजी उपसभापती मल्लाप्पा मारीहाळ, भाजपा युवा नेते पंडित ओगले आदींनी विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवळू पवार होते.
कार्यक्रमाला गावातील ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta