खानापूर : उद्या शनिवार दिनांक 10 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2.30 मिनिटांनी हनुमान मंदिर बाजारपेठ लोंढा येथे विश्वभारती कला व क्रीडा संघाची महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली आहे.
आधुनिक युगात विद्यार्थी, पालक व नागरिक विविध प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहेत. त्याचा परिणाम अल्पकालीन मृत्यू आहे. यापासून समस्त जनतेला मुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर योगासन, व्यायाम व मैदानी खेळाची गोडी लावण्यासाठी हा एक छोटासा क्रांतिकारी विचार प्रगतीपथावर नेण्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान अमूल्य आहे. त्यासाठी या सभेला आपण उपस्थित राहून समाजाला परिवर्तनाच्या मार्गावर नेण्यासाठी खारीचा वाटा उचलण्यासाठी सभेला आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती कृष्णा जयवंत खांडेकर यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta