खानापूर : बेनलिंग औराच्या इलेक्ट्रिक दुचाकी कंपनीच्या बी. एम. मोटर्स शोरूमचे उद्घाटन बुधवार (ता.07) रोजी चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक राजेंद्र मुतगेकर यांच्या हस्ते बेळगांव येथील काँग्रेस रोड पराठा कॉर्नरजवळ झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गर्लगुंजीचे सुपुत्र बांधकाम व्यावसायिक व शोरूमचे संचालक बी. एम. चौगुले होते.
अभियंता व गोव्यातील नामवंत व्यावसायिक रवींद्र पाटील, राष्ट्रीय जनसंसद महासचिव महेश बेनाडीकर पाटील, गोवा मराठा संघाचे अध्यक्ष विष्णू निकम, म. ए. समितीचे नेते गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. शोरूमचे उद्घाटन मुतगेकर यांनी फित कापून केले.
गोमंतकातील अफाट यशानंतर बेळगांव नगरीत प्रवेश करून त्यांनी पर्यावरणपूरक गोष्टींचा सखोल विचार तसेच वाढत्या इंधन महागाईमुळे आता देशात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक दुचाकींचा पर्याय सर्वांसमोर असल्याचा चौगुले यांनी विचार करून शोरूमची सुरुवात केली आहे, असे उद्घगार मुतगेकर यांनी काढले.
Belgaum Varta Belgaum Varta