आठ दिवसाच्या आत निवेदनाचा विचार न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर, नंडगड आणि पारीश्वाड येथिल सरकारी रुग्णालयातील पाच डॉक्टर गेल्या बऱ्याच महिन्यापासून डेप्युटेशनवर आहेत, डॉक्टरांची कमतरता असून देखील नियमबाह्य पद्धतीनं ते गैरहजर आहेत. त्यांना त्वरित सेवेत हजर होण्यासाठी नोटीस द्यावे, अशा मागणीचे निवेदन आपच्या वतीने उपतहसिलदार के. वाय. बिद्री यांना देण्यात आले होते.
निवेदनात, खानापूर येथील दोन तज्ञ महिला डॉक्टर, नंदगड येथील २ डॉक्टर तसेच पारीश्वाड येथील एका फार्मसिस्ट डेप्युटेशनवर आहे. तालुक्याची लोकसंख्या पाहता तालुका हॉस्पिटलमध्ये सर्व तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते. दुर्गम भागातील सर्व सामान्य जनतेला याची मोठी मदत होते. असे असताना देखील तालुका आरोग्याधिकाऱ्यानी त्या डॉक्टरांना मोकळीक का दिली आहे. परिणामी रुग्णांचे हाल होत आहे. त्याकरीता त्या डॉक्टरांना त्वरित त्यांच्या नियुक्तीच्या जागी रुजू होण्याचे आदेश करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती. पण याचा विचार न केल्याने पुन्हा निवेदन देऊन उग्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
यावेळी आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील, जिल्हा अध्यक्ष शंकर हेगडे, दशरथ बानोशी, लबिब शेख, चंद्रकांत मेदार, मोहन मलिक, शिवाजी गुंजिकर, गोपळ गुरव, राम गावडे, राजू टोपन्नावर, प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta