Tuesday , March 3 2026
Breaking News

सिंगीनकोपच्या कोसळलेल्या शाळा इमारतीला केंद्रीय पथकाची भेट

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीच्या तीन खोल्या जमिनदोस्त झाल्या. याची पाहणी केंद्रीय पथकासह जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज केली.
यावेळी केंद्रीय जल आयोग, जल उर्जा मंत्रालयाचे संचालक अशोक कुमार व्ही यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अभ्यास पथकात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. व्ही. शास्त्री तसेच कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. जी. एस., श्रीनिवास रेड्डी, सीईओ दर्शन, तहसीलदार प्रविण जैन, बीईओ राजेश्री कुडची, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी राजेश धनवडकर, आदींचा समावेश होता.
यावेळी सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीच्या तीन खोल्यांची झालेल्या नुकसानीची माहिती करून घेतली.
मुख्याध्यापिका सौ. एल. डी. नलवडी यांनी उपस्थित अधिकारी वर्गाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी बोलताना मुख्याध्यापिका सौ. एल. डी. नलवडी म्हणाल्या की, गेल्या जुलै महिन्यात मुसळधार पावसाने शाळेच्या तीन खोल्या कोसळल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना गावच्या समुदाय भवनात बसविण्याची सोय करण्यात आली. यावेळी बीईओ राजश्री कुडची यांनी शाळेच्या समस्या सांगितल्या. शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष विश्वनाथ पाटील व सदस्य तसेच गावचे पंच कमिटी, पालक आदींनी शाळेच्या समस्या मांडल्या.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *