खानापूर (प्रतिनिधी) : लोकोळी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेची कौलारू इमारत मुसळधार पावसाने दोन खोल्या जमीनदोस्त झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
घटनेची माहिती मिळताच एसडीएमसी अध्यक्ष कृष्णा सुतार व सदस्यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी मुख्याध्यापक पी. व्ही. पाटील यांनी शाळेची इमारत कोसळल्याची माहिती संबंधित शिक्षण खात्याला देऊन नवीन इमारत उभारण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
लोकोळी शाळेत सध्या केवळ तीन खोल्या आहेत. लोकोळी मराठी शाळेत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग असून एकूण 95 विद्यार्थी आहेत. तेव्हा लवकरात लवकर नवीन इमारत उभारण्याची मागणी लोकोळी गावच्या ग्रामस्थांतून तसेच पालकांतून, शिक्षणप्रेमींतून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta