खानापूर (प्रतिनिधी) : चोर्ला-कणकुंबी महामार्गावरील कणकुंबी विश्रामधामच्या समोर दुचाकीस्वाराला ४०७ टेम्पोने ठोकरल्याने रविवारी दि. ११ रोजी दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रविवारी दि. ११ रोजी दुपारी कणकुंबी विश्रामधामच्या समोर चिगुळे (ता. खानापूर) गावचा सुपूत्र काशीनाथ प्रकाश गावडे (वय २२) हा दुचाकीवरून जात असताना ४०७ टेम्पोची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
तो गोवा येथे हाॅटेलमध्ये कामाला होता. अपघातानंतर मृतदेह खानापूर शवागृहात दाखल करण्यात आला. लागलीच
अपघाताची माहिती भाजप युवा नेते पंडित ओगले यांना मिळताच, पंडित ओगले यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आपघाताची माहिती दिली. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यास मदत केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी संजय नांद्रे यांना विनंती करून नातेवाईकांकडे मृतदेह देण्यास सहकार्य केले.
Belgaum Varta Belgaum Varta