खानापूर (तानाजी गोरल) : नंदगड बाजारपेठ येथील मयूर कापसे यांच्या घरी माणिक कुरिया यांचा सायबर कॅफे व ओम डिजिटल फोटो स्टुडिओ शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत भस्मसात झाला. त्यामुळे फोटोग्राफर माणिक कुरिया यांना आठ लाखाचे नुकसान झाले. त्यामध्ये तीन लाखाचे दोन कॅमेरे, कॅम्पुटर, झेरॉक्स मशीन, प्रिंटर मशीन शिलाई मशीन, तसेच ग्राहकांचे फोटो अल्बम यांचा समावेश आहे. आज रात्री पहाटे तीनच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केले शेजारी असलेल्या काही व्यक्तींच्या निदर्शनास आल्याने त्यांनी आजूबाजूच्या शेजाऱ्यांना कळवून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुढील होणारा मोठा अनर्थ टळला ही बातमी समजताच बऱ्याच लोकांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीबद्दल हळहळ व्यक्त केली व माणिक कुरिया यांना धीर देण्याचे कार्य केले, त्यामध्ये माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी पंचवीस हजार रुपयाची आर्थिक मदत देऊन माणिक कुरिया यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. व नंदगड बरोबर खानापूर तालुक्यामधील दानशूर व्यक्तींना झालेल्या दुर्घटनेबद्दल गांभीर्य ओळखून मदत करण्याचे आवाहन केले. तसेच आज संध्याकाळी लक्ष्मी मंदिर येथे एकत्र जमून मदत निधी जमविण्यासाठी बाजारमध्ये फेरी काढण्यात येणार आहे. तसेच ज्या कोणा व्यक्तींना देणगी द्यावयाच्या असल्यास खाली माणिक कुरिया यांच्या बँक अकाउंटवर आपणाला जमेल तेवढी आर्थिक मदत जमा करावी व एका होतकरू तरुण उद्योजकाला पुन्हा उभारी देण्याचे मोलाचे कार्य करावे केव्हीजी बँक अकाउंट नंबर89043278329 आयएफसी कोडkvgb 0002510
Belgaum Varta Belgaum Varta