खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीत सतत भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार कायम जोर धरू लागल्याने जिल्हा पंचायतीचे अधिकारी, तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक अधिकारी तसेच ग्राम पंचायतीचे विस्तार अधिकारी व ग्राम पंचायतीची बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत नंदगड ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष मन्सुर तहसीलदार यानी निधी दोन मधून रक्कम खर्ची घालण्यात आली आहे. प्रत्यक्षात कुठे खर्ची घालण्यात आली की, कुठे खर्च करण्यात आली आहे. याबाबत ग्राम पंचायतीचे पीडीओ अनंत भिंगे यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. असा प्रश्न बैठकीत उपस्थित केला. तसेच दररोज स्वच्छता करण्यात येते असे दाखवुन खर्च दाखविला आहे. यासंबंधी ही विश्वासात घेतले नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
तर ग्राम पंचायतीचे सदस्य लक्ष्मणराव बोटे कर यांनी नंदगड गावात एकाच दिवशी तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. मात्र यासंबंधी निविदा मागविण्यात आल्या नाहीत. तसेच सदस्यांना विश्वासात सुध्दा घेतले नाही. यामुळे पीडीओच्याकडून भ्रष्टाचार झालेला आहे हे स्पष्ट होत आहे. असा आरोप केला.
ग्राम पंचायतीचे सदस्य महमंद शफी काजी यांनी वरिष्ठ अधिकारी वर्गाने भ्रष्टाचार उघडकीस न आणल्यास स्वत: लोकायुक्तांच्याकडे तक्रार करण्यात येईल असे सांगितले.
बैठकीत उपकार्यदर्शी जयपाल हेमनायक यांनी पीडीओनी केलेले ताळेबंद व याची पडताळणी करून तात्काळ निर्णय घेणे शक्य नसल्याने काही कालावधी लागणार असल्याचे सांगितले.
यावेळी या सर्व सह्याची तपासणी करून ६५ लाखाच्या निधीची माहिती न मिळाल्यास पीडीओ अनंत भिंगे याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. बैठकीला सर्व ग्राम पंचायतीचे सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta