खानापूर (प्रतिनिधी) : कापोली (के सी) ता. खानापूर येथे नुकताच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आंबोली मराठी शाळेचे शिक्षक विठ्ठल एन. कुंभार याचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापोली (के सी) मराठी शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष कृष्णा नाईक होते.
तर व्यासपीठावर ग्राम पंचायत सदस्य महादेव पाटील, सदस्या सौ. वंदना हणबर, माजी अध्यक्षा सौ. सुनिता गावडे, माजी सदस्य व्यकंट गावडे, एसडीएमसी उपाध्यक्ष सौ. सरस्वती गावडे, तसेच सदस्य निळकंठ नाईक, रामाणी हणबर, दयानंद कुलम, पांडुरंग घाडी, ज्ञानेश्वर गावडे, प्रकाश पारवाडकर, दीपक गावडे, नागेश गावडे, नामदेव हणबर, सदस्या सौ. संध्या नाईक, सौ स्वाती नाईक, आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापक व्ही. एन. कदम यांनी करून उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमाची सुरूवात मुलींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली.
यावेळी आंबोली शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कुंभार यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल, श्री फळ, पुष्पहार व भेट वस्तू देऊन सत्कार केला.
यावेळी उपस्थित पाहुण्याची भाषणे झाली.
सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले विठ्ठल कुंभार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी, पालक गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार डी. जी. सुर्यवंशी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta