Tuesday , March 3 2026
Breaking News

पारिश्वाड – बिडी दरम्यानच्या मलप्रभा नदीवरील ब्रीजची भाजपा नेत्यांकडून पहाणी

Spread the love

 

खानापूर (तानाजी गोरल) : पारिश्वाड ते बिडी रस्त्यावरील मलप्रभा नदीवर बांधण्यात आलेले ब्रीज मोडकळीला आलेले असून कोणत्याही क्षणी आणि केव्हाही कोसळून पडण्याची स्थिती निर्माण आहे. याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी भाजपाचे नेते व जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी केली आहे.
यासंबंधी त्यांनी बेळगावचे मुख्य एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि खानापूर पीडब्ल्यूडीचे एइई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्यासमवेत ब्रीजची पहाणी केली व याबाबत सदर ब्रीज नवीन बांधण्यासाठी आराखडा तयार करण्यास सांगितले असून याची कल्पना त्यांनी पीडब्ल्यूडीचे मंत्री श्री. सी. सी. पाटील यांना दिली असता मंत्रीमहोदयानी प्रमोद कोचेरी यांना ताबडतोब नवीन ब्रीज बांधण्याचा आराखडा घेऊन बेंगलोर येथे बोलावले असून सदर ब्रीज ताबडतोब मंजुर करून देण्याची ग्वाही दिली आहे. या रस्त्यावर वाहनांची व लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पुढे जीवितहानी व धोका होण्याआधीच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी चालविलेल्या या प्रयत्नांबद्दल या भागातील जनतेतून व प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *