खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीचे मुख्याध्यापक सी. एस. कदम यांना मिळाला. याबद्दल तसेच गावातील पहिला एम.डी. पदवी प्राप्त शाळेचा माजी विद्यार्थी डॉक्टर सुरज मारुती साबळे यांचा आणि हायस्कूलच्या मुलींच्या खो-खो संघाने व वैयक्तिक प्रकारातील खेळाडूंनी तालुकास्तरीय विजय संपादन करत जिल्हास्तरीय निवड झाल्याबद्दल शाळा सुधारणा कमिटी, गावकरी, माजी विद्यार्थी व शाळेच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य माध्यमिक नोकर संघाचे अध्यक्ष व उर्दू हायस्कूल मुख्याध्यापक सलीम कित्तूर व खानापूर माध्यमिक शिक्षक नोकर संघाचे अध्यक्ष व्ही. बी. होसूर सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.जे. सावंत सर यांनी व आभार सौ वर्षा. चौगुले यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta