खानापूर (प्रतिनिधी) : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत पंधरवडा दिन पाळण्यात येणार असून या पंधरा दिवसांत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये क्षयरोगाचे निर्मूलनासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पाणी आडवा पाणी जिरवा, रक्तदान, झाडे लावा झाडे जगवा आदी कार्यक्रम भाजपा राबविणार असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कचेरी यांनी गुरूवारी तालुका भाजप कार्यालयात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी व्यासपीठावर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, माजी आमदार अरविंद पाटील, किरण यळ्ळुरकर, सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई, जोतिबा रेमाणी, बसू सानिकोप, वासंती बडगेर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बोलताना अध्यक्ष संजय कुबल म्हणाले की, येत्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यात भाजप पक्षासाठी योगदान दिलेल्या स्थानिक उमेदवाराचाच उमेदवारीसाठी विचार केला जाईल. यासाठी आम्ही ज्येष्ठ नेत्यांना भेटणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर राज्याचे प्रभारी अरूण सिंह यांना भेटून खानापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्यात यावी, अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
तालुक्यातील बुथ वार कार्यकर्त्यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करू, असे माजी आमदार अरविंद पाटील यांनी सांगितले.
यावेळी तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी राजेंद्र रायका, अशोक देसाई, सयाजी पाटील, मल्लापा मारिहाळ, सुनील मासेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक बसु सानिकोप यांनी केले. तर आभार गुंडू तोपिनकट्टी योनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta