Wednesday , March 4 2026
Breaking News

शिप्पूर ते हडलगा रस्त्यावर खड्डेच खड्डे

Spread the love

 

खानापूर : शिप्पूर ते हडलगा रस्त्यावर पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून दुचाकीस्वारांना खड्डे चुकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात वारंवार अपघात होत असून गंभीर जखमा झाल्याच्या घटना घडत आहेत. नांगनुर बस स्टॉपसमोर धोकादायक भली मोठी चर पडली असून तिथं वारंवार अपघात घडत आहेत. तसेच बुगटे आलूर येथे स्पीड ब्रेकवर मोठा खड्डा पडला आहे. इतर ठिकाणीही लहान-मोठे खड्डे पडले असून कृपया मोठा अनर्थ होण्याअगोदर सदरचा रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *