खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिमागासलेला व दुर्गम तालुका म्हणून सर्वाना परिचित आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात नेहमीच अनेक समस्या भेडसावत असतात. अशा समस्यानी ग्रस्त असलेल्या खानापूर तालुक्याला गेल्या आठ महिन्यापासून तालुका पंचायत कार्यनिर्वाह अधिकारी (एईओ) पद रिक्त होते. त्यामुळे तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.
आज शुक्रवारी दि. १६ रोजी कागवाड तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाह अधिकारी (ईओ) वीरनगौडा पी. यगनगौडर यांनी कार्यभार स्विकारला.
यावेळी पूर्वीचे प्रभारी ईओ राजेश धनवाडकर यांनी आपली सूत्रे नुतन तालुका पंचायत ईओ वीरनगौडा पी. यगनगौडर यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीचे पीडीओ, तालुका अधिकारी व तालुका पंचायतीचे कर्मचारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यापुढे तरी तालुका पंचायतीचे कामकाज सुरळीत चालेल अशी खानापूर तालुक्यातील जनतेतून आशा पल्लवित झाली आहे.
यावेळी तालुका पंचायतीचे मॅनेजर एस. एस. सपटला यांनी प्रास्ताविक केले.
ए. एम. अमणगी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta