Wednesday , March 4 2026
Breaking News

कणकुंबी चेकपोस्टवर 450 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त

Spread the love

 

खानापूर : स्थानिक उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी गोव्यातून कर्नाटकात येणाऱ्या मालवाहू वाहनाला तालुक्यातील कणकुंबीजवळील उत्पादन शुल्क चेकपोस्टवर थांबवून तपासणी केली असता त्यात गोवा राज्यातील 450 लिटर दारू अवैधरित्या गोव्यातून कर्नाटकात आणली जात असल्याचे आढळून आल्याने कारवाई करण्यात आली.
तपासणी दरम्यान, बेंगळुरू शहरात नोंदणी केलेल्या लाल रंगाच्या स्वराज मझदा वाहनात गोवा राज्यातील 750 मिली बॉम्बे रॉयल व्हिस्कीच्या एकूण 450 लिटरच्या 600 बाटल्या आढळून आल्या. बेंगळुरू येथील टी. जयराम असे वाहन चालकाचे नाव आहे. त्याला वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी जप्त केलेल्या दारूची किंमत ६६ हजार रुपये असून वाहनाची किंमत ७ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी दिली. खानापूर उत्पादन शुल्क स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधीक तपास सुरू आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क निरीक्षक मंजुनाथ गलगली, उपनिरीक्षक पुष्पा गडाडी, कर्मचारी विठ्ठला क्वारी, रायप्पा मन्निकेरी, गुंडूराव पुजेरी, बी. एस. अटगल, प्रवीणा बेलाकुडा, एस. एस. पाटील, सय्यदा जलानी यांनी छाप्यात सहभाग घेतला.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *