खानापूर : भारतीय जनता पार्टी खानापूर यांच्या शिष्टमंडळाने बेंगलोर येथे धर्मादाय हज व वक्फ मंत्री सौ. शशिकला जोल्ले यांची भेट घेऊन खानापूर तालुक्यामधील रवळनाथ मंदिर खानापूर, निटुर, लोंढा, पारिशवाड, भांबार्डा, चिक्कदिनकोप, मंग्यानकोप, कोडचवाड, आमटे, बैलूर या 10 गावातील देवस्थानाला समुदाय भवनाची मागणी केली.
मंत्र्यांनी या सर्व 10 गावातील समुदाय भवनाला 150 कोटी मंजुरीचा आदेश दिला आहे व हा निधी लवकर मंजूर केला जाईल, असे शिष्टमंडळास सांगितले. याप्रसंगी उपस्थित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रमोद कोचेरी, खानापूर भाजपा अध्यक्ष श्री. संजय कुबल, माजी जिल्हा पंचायत सदस्य, श्री. बाबुराव देसाई, वन विभागाचे संचालक श्री. सुरेश देसाई, सुनील मडीमनी इतर ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta