खानापूर (तानाजी गोरल) : बिडी ते पारिश्वाड रस्त्यावरील कोसळलेल्या ब्रिजचा आराखडा सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील यांना भाजपच्या शिष्टमंडळाने सादर केला.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रमोद कोचेरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पदाधिकारी व नेते मंडळींनी कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री श्री. सी. सी. पाटील यांची बेंगलोर येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेतली व पारिश्वाड बिडी रस्त्यावरील मलप्रभा नदीवरील कोसळलेल्या ब्रिजचा नवीन ब्रिज बांधण्याचा आराखडा सादर केला व सदर ब्रिज अर्धे कोसळले असून प्रवाशांची गैरसोय होत असून कोणत्याही क्षणी अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लवकरात लवकर ब्रिज मंजूर करण्याची मंत्रीमहोदयाना विनंती करण्यात आली असता सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील यांनी सदर आराखडा लक्ष देऊन पाहिला व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण लवकरात लवकर सदर आराखडा मंजूर करून देतो, असे सांगितले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजपा नेते बाबुराव देसाई, सुभाष गुळशेट्टी, सुरेश देसाई, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस सुनील मड्डीमनी, श्रीकांत इटगी व आदी नेतेमंडळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta