खानापूर (प्रतिनिधी) : निडगल (ता. खानापूर) येथील मराठी मुलाच्या शाळेत ग्रामस्थ व शाळा सुधारणा मंडळ यांच्या वतीने निडगल मराठी शाळेचे मुख्याध्यापक डी. व्ही. कुंभार, निडगल गावचे सुपुत्र व ओलमणी हायस्कूलचे मुख्याध्यापक सी. एस. कदम, याना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच आध्यात्मिक क्षेत्रातुन श्रीदत्त महाराज आडी यांच्याकडून एन. बी. पाटील, जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळालेले वाय. के. खांबले, तसेच बेळगाव तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविलेल्या सविता पाटील, नुतन सीआरपी ज्योती कदम आदीचा सत्कार सोहळा शाळेच्या सभागृहात नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बरगाव ग्राम पंचायतीचे सदस्य प्रविण पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून देवापा कदम, परशराम कदम, खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वाय. एम. पाटील, संघटनेचे सभासद एस. एल. हळदणकर, बरगाव केंद्रातील शाळेच मुख्याध्यापक व शिक्षक तसेच एसडीएमसी अध्यक्ष गंगाराम सुतार, उपाध्यक्षा रेश्मा कदम, सदस्य मल्लापा पाटील, दिगंबर देसाई, परशराम अल्लोळकर, विठ्ठल गुंजीकर, कृष्णा कदम, सुभाष कदम, विठ्ठल मादार, सुभाष निडगलकर, जयदेव देसाई उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मुलीच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली.
यावेळी सत्कार मुर्तीचा पुष्पहार, शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
तर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वाय. एम. पाटील, बी. बी. मुरगोड, एस. एल. हळदणकर तसेच सत्कार मुर्ती आदीची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जे. ए. जांगळे यांनी केले
तर आभार श्रीमती आर. ए. चिट्टी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta