खानापूर (तानाजी गोरल) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कालपासून खानापूर तालुका भाजपाकडून तालुक्यात पुढील पंधरा दिवस अनेक उपक्रम राबविण्यात येत असून काल सरकारी रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटण्यात आली व चौकात पेढे वाटून तसेच सर्व कार्यकर्त्यांना मोदी चहा देण्यात येऊन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आज त्याचाच एक भाग म्हणून श्री शिवछत्रपती स्मारक येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून जवळ जवळ अडीचशे ते तीनशे कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी रक्तदान शिबिरात भाग घेऊन आपले रक्तदान केले आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते माजी आमदार अरविंद पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपा नेते लैला शुगरचे चेअरमन शांतीनिकेतन स्कूलचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योतिबा रेमाणी, भाजपा युवा नेते पंडित ओगले, बसू सानीकोप, वननिगमचे राज्य संचालक सुरेश देसाई, माजी ता. पं. सदस्य अशोक देसाई, जनरल सेक्रेटरी भाजपा गुंडू तोपिनकट्टी, रामदेव स्वीट मार्टचे मालक राजेंद्र रायका, प्रकाश निलजकर, मोहन पाटील, भूषण ठोंबरे, संजु गुरव, गोपाळ भेकने, तसेच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta