Wednesday , March 4 2026
Breaking News

कबड्डी व व्हॉलीबॉल खेळात जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना “टी-शर्ट”चे वाटप

Spread the love

 

खानापूर : कबड्डी व व्हॉलीबॉल खेळात खानापुर तालुक्यातील कक्केरी गावच्या श्री बिष्टदेवी हायस्कूलच्या विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय निवडीसाठी बेळगाव ग्रामीण भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा व खानापूर भाजपा महिला मोर्चा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांनी नियती फाउंडेशनच्या वतीने खेळाडूंना ‘टी-शर्ट’ वाटप केले.

यावेळी बोलताना युवा नेते नागेश रामजी म्हणाले की, “ग्रामीण मुलींना खेळात उच्च स्तरावर जाण्यासाठी शिक्षकांचा खूप मोलाचा वाटा आहे” आणि आमच्या नेत्या डॉ. सोनालीताई नेहमी खेळाडूंना उच्च पदावर पोहोचण्यासाठी प्रोत्साहन देतात. यावेळी निवृत्त शारीरिक शिक्षक रामचंद्र बेन्नोरे, गावातील पुढारी रमेश कोचेरी, मुख्याध्यापक एरणगौडा पाटील, शिक्षक एस. एन. राठोड, भाजप नेते नागेश रामजी, परशुराम कोलकार, कुशल अंबोजी, शाळेचे शिक्षक व कर्मचारी व खेळाडू उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *