खानापूर : श्री सातेरी माऊली अर्बन सौहार्द सहकारी नि. गुंजीची 26 वी सर्वसाधारण सभा दि. 19 सप्टेंबर 2022 रोजी खेळीमेळीत संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. खेमाण्णा महादेव घाडी होते. सभेचे स्वागत आणि अध्यक्ष निवड श्री. के. वाय चोपडे गुरुजी यांनी केले व त्याला अनुमोदन श्री. जयकुमार गुरव यांनी केले.
यावेळी चेअरमन खेमाण्णा महादेव घाडी म्हणाले की, यावर्षी संस्थेची वार्षिक उलाढाल 59 कोटी 68 लाख 74 हजार 942 रुपये इतकी झालेली आहे. निव्वळ नफा 9 लाख 48 हजार 816 रुपये झालेला आहे तसेच यावर्षी सर्व सभासदांना 12 टक्के लाभांश देण्यात येणार आहे. कोरोना कळातही सोसायटीने आपली प्रगतीपर वाटचाल सुरूच ठेवली आहे. सोसायटीच्या जिथे शाखा आहेत त्या स्वत:च्या इमारतीत आहेत. याशिवाय खानापूर येथे व्यापार संकुलन बांधलेले आहे. संस्थेच्या ठेवी 31 कोटी 46 लाख 57 हजार 801 रुपये इतकी आहे. खेळते भांडवल 37 कोटी 76 लाख 62 हजार 929 रुपये आहे.
2021 -22 सालाचे अहवाल वाचन रामू करंबळकर व नफा विभागणी वाचन अनिल पाटील यांनी केले. ताळेबंद पत्रक वाचन रामू करंबळकर यांनी तर नफा-तोटापत्रक तसेच सरकारी कायद्याचे स्पष्टीकरण करून माहिती शकील हुदली जनरल सेक्रेटरी यांनी दिली. पुढील वार्षिक अंदाजपत्रक पुनाप्पा बिर्जे यांनी मांडले आणि पुढील वर्षासाठी मे. सतीश नाडगौडा यांची सीए म्हणून पुन्हा निवड करण्यात आली.
या सभेसाठी व्हा. चेअरमन श्री. मिनाप्पा पाटील, संचालक श्री. रामचंद्र पाटील, श्री. रमेश पवार, श्री. के. वाय. चोपडे, श्री, बळीराम चव्हाण, श्री. पांडुरंग मन्नोळकर, श्री कृष्णा मन्नोळकर, श्री. प्रकाश कांबळे, श्री. हेमंत कोळी, श्री. जयकुमार गुरव, श्री. मनोहर बरूकर, श्री. महादेव नाईक, श्री. भरमानी नाईक, संचालिका सौ. मयुरी गोरल, सौ. सीता घाडी तसेच यावेळी सल्लागार व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. के. वाय. चोपडे यांनी केले.