खानापूर : गेल्या पंधरा दिवसापासून खानापूर तालुक्यातील विविध भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गावाबाहेरील लोकवस्ती कमी असलेली घरे चोरट्यांनी लक्ष केली असल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस खात्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून खानापूर तालुक्यात स्वतः डीवायएसपी शिवानंद कटगी खेडोखेडी जाऊन जनजागृती करीत आहेत.
घरामध्ये किमती वस्तू, दागिने जास्त पैसे ठेऊ नयेत तिजोरीच्या दरवाजाला कुलूप लावू नयेत जेणेकरून ती फोडली जाऊन नुकसान होऊ नयेत संशयास्पद व्यक्ती दिसल्यास पोलिसांना संपर्क करावे, अशी माहिती जनजागृती दरम्यान सांगितले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta