खानापूर (तानाजी गोरल) : रवळनाथ मंदिर खानापूर येथे सालाबाद प्रमाणे संत ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. शनिवारी दि. 17 पासून संत ज्ञानेश्वर चालू आहे. या सात दिवसांमध्ये विविध धार्मिक आणि पंढरपूर येथून नामवंत कीर्तनकार व प्रवचन सांगणारे वारकरी महाराज आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज खानापूर शहरातून माऊलीची पालखी वाजत- गाजत मलप्रभा क्रीडांगणाकडे नेण्यात आली व तिथे पंढरपुरातील घोडे आणून रिंगण कार्यक्रम करण्यात आला आणि रिंगण कार्यक्रम पाहण्यासाठी तालुक्यातील व इतर भागातील वारकरी व नागरिक मोठ्या संख्येने आले होते. उद्या दुपारी12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर पारायण सोहळ्याची सांगता होईल.